Zero Hour : उद्या मविआची महापत्रकार परिषद, सांगलीसह सगळेच वाद सुटतील ?
Continues below advertisement
Zero Hour : उद्या मविआची महापत्रकार परिषद, सांगलीसह सगळेच वाद सुटतील ?
सांगलीच्या जागेचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाहीय. आज उद्या म्हणत.. गेल्या तीन आठवड्यांपासून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झालाय. तोच संघर्ष दिल्ली दरबारीही पोहोचलाय. आणि आता त्याच संघर्षावर उद्यापर्यंत तोडगा काढावा.. असा अल्टिमेटमच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिलाय.. असं म्हणावं लागेल.. कारण, उद्याच्या गुढीपावड्याच्या मुहूर्तावर मविआची संयुक्त पत्रकार परिषद आहे.. त्यात तिन्ही पक्षांना एकजूट दाखवावी लागेल ...उमेदवार जाहीर करावे लागतील ...
Continues below advertisement