Zero Hour : 'लाडकी बहीण' महायुतीची की अजितदादांची? राष्ट्रवादीच्या नव्या जाहिरातीवरून नाराजी नाट्य
Continues below advertisement
Zero Hour : 'लाडकी बहीण' महायुतीची की अजितदादांची? राष्ट्रवादीच्या नव्या जाहिरातीवरून नाराजी नाट्य
भाजप आणि नाराजी म्हंटलं की जी नावं आठवतात त्यात पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर असतं. सध्या त्यांच्यावर पुण्यातल्या कोथरुड, वडगाव शेरी,शिवाजीनगर आणि बारामतीतील खडकवासला या चार विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. त्याचा आढावा घेण्यासाठीच त्या पुणे दौऱ्यावर आहेत. तिथे आज वडगाव शेरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार केली.. सध्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे इथले आमदार आहेत मात्र ही जागा भाजपला सुटली नाही तर राष्ट्रवादीचं काम करणार नाही असा इशाराही पंकजा मुंडेंसमोरच भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.
Continues below advertisement