Zero Hour : सांगलीचा पाटील कोण होणार? बारामतीत कुणाची बाजी? झिरो अवरमध्ये खास चर्चा!

Continues below advertisement

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा राज्यातील तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होणार असून त्यामध्ये बारामती, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह एकूण 11 हाय होल्टेज लढतींचा समावेश आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यातील दोन्ही गटांची अग्निपरीक्षा या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार की सहानुभूतीची लाट चालणार याचं उत्तर मिळणार आहे. 

महाराष्ट्रातल्या निवडणुकीतला हा सर्वात हायव्होल्टेज लढती असणारा टप्पा आहे. बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, रायगडसोलापूरलातूर या 11 लक्षवेधी लढती असल्यानं आजच्या मतदानाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram