
Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाड
Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाड
विधानसभा निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षही कामाला लागले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असून मनसेही मैदानात ताकदीने उतरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राजकीय भूमिका आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल यावर त्यांनी परखड भाष्य केलं. आज सत्तेत असलेल्या आणि यापूर्वी सत्तेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका बदलल्याचा इतिहास त्यांनी सांगितला. यावेळी, जनसंघ, इंदिरा गांधी, काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांनी बदलेल्या भूमिकांबद्दल माहिती दिली. तर, मनसे पक्षाने कधीही भूमिका बदलली नसल्याचं म्हटलं. आता, राज ठाकरेंनी भाजपच्या बदल्या भूमिकेवर केलेल्या टीकेवर भाजपनेही (BJP) पलटवार केला आहे.
भाजपने कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही, राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अर्धवट माहितीच्या आधारावर असल्याचा पलटवार भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. राज ठाकरेंचे मित्र असलेल्या आशिष शेलार यांनी राज ठाकरेंकडून भाजपवर करण्यात आलेल्या टीकेवर राजकीय भूमिकेतून पलटवार केला आहे. राष्ट्र प्रथम आणि राष्ट्र निर्माणाच्या आधारावर आम्ही तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही, असे म्हणत भाजपने भूमिका बदलल्याच्या आरोपांवरून शेलारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.