Zero Hour Paris Olympic : कर्णधार हरमनप्रीतसिंगने झळकावले 2 गोल, ऑलिम्पिकमध्ये भारताची विजयी कामगिरी

Continues below advertisement

भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी सामना पार पडला. भारताला उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं कांस्य पदाकासाठी स्पेन विरोधात लढत द्यावी लागली.  कांस्य पदकाच्या लढतीत दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं केलेले दोन गोल आणि पीआर श्रीजेशचा भक्कम बचाव या जोरावर भारतानं कांस्य पदकावर नाव कोरलं. या विजयासह भारतीय हॉकी संघानं पीआर श्रीजेशच्या कारकिर्दीला अनोखा सलाम केला आहे.   भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्य पदकाची लढत रोमांचक झाली. भारत आणि स्पेन यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये दमदार खेळ केला. यामुळं दोन्ही संघांना गोल करता आला नाही. भारताविरुद्ध दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेननं पेनल्टी स्ट्रोकचा लाभ उठवत गोलं केला.  स्पेनसाठी हा गोल मार्क मिरालेस यानं केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram