Zero Hour Pan Card : पॅन 2.0 ला केंद्र सरकारची मंजुरी, नवा पॅन कसा असणार?
Zero Hour Pan Card : पॅन 2.0 ला केंद्र सरकारची मंजुरी, नवा पॅन कसा असणार?
पॅन कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल जेणेकरून ते वापरण्याचा मार्ग सोपा होईल. सर्व प्रकारच्या व्यवसायाची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये जोडली जातील. पॅन कार्डशी संबंधित सर्व सेवांसाठी एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, ज्यामुळे युजर्सचा अनुभव सुधारेल. युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पॅन कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये देखील स्थापित केली जातील, जेणेकरून फसवणुकीसारख्या घटनांवर मात करता येईल. शुल्क आकारले जाणार नाहीपॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही, असं केंद्रीय मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी कुठेही अर्ज करण्याची गरज भासणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. देशातील ज्या 78 कोटी लोकांना पॅन कार्ड देण्यात आले आहे, त्यांना विभागाकडून नवीन पॅन कार्ड पाठविण्यात येणार आहे.