Zero Hour Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय लांबतोय?

Continues below advertisement

Zero Hour Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय लांबतोय?

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचा निरोप दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्रिपद देण्याची तयारी वरिष्ठांनी दर्शवली आहे. पण दोन दिवसांपासून असलेला मुख्यमंत्रिपदाचा हा पेच सुटलाय तो अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या एका पत्रामुळे. राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिल्यानंतर दिल्लीतून घडामोडींना वेग आल्याची माहिती समोर आली.

मुख्मंत्री कोण होणार? निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं आता हळूहळू उत्तर सापडू लागलंय. 'मी पुन्हा येईन' म्हणणारे देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं सूत्र सांगताहेत. आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

अजित पवारांचा फडणीसांना पाठिंबामुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांना एक पत्र दिलं आहे. राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यानंतर दिल्लीतून वेगवान घडामोडी घडल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram