Zero Hour on Chhagan Bhujbal : शांत होणार की पक्ष सोडणार? छगन भुजबळांसमोर पर्याय कोणता?

Continues below advertisement

Zero Hour on Chhagan Bhujbal : शांत होणार की पक्ष सोडणार? छगन भुजबळांसमोर पर्याय कोणता?

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याशी माझं सकाळीच बोलणं झालं आहे. प्रमाणिकपणाचं दुसरं नाव म्हणजे भुजबळ साहेब असल्याचे वक्तव्य अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केलं आहे. भुजबळ साहेब यांच्यासोबत ओबीसी समाज आहे. जरांगे यांच्यासारख्या दिवाणी मोटरसायकल सारखे त्यांचे काम नाही असेही ते म्हणाले. छगन भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याच्या मुद्याबाबत त्यांना विचारण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ यांनी मंत्रीपद न दिल्यानं ते नाराज आहेत. या मुद्यावरुन छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या काँग्रेसने केली 

दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   काँग्रेसची एखाद्या वाक्याची तोडफोड करुन सांगण्याची प्रवृत्ती आहे. एखाद्या गोष्टीत हे कुठपर्यंत नीच पातळी गाठतील ते सांगता येत नसल्याचे सदावर्ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या काँग्रेसने केली आहे. नेहरु संविधानासोबत कसं वागत आहेत, हे दाखवण्याचा अमित शाह यांचा प्रयत्न होता. त्याची तोडफोड करण्याचं काम काँग्रेस करत असल्याचे सदावर्ते म्हणाले. काँग्रेस, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना मला सांगायचं की तोडफोड करुन तुम्ही वनवा लावण्याचे काम करु नका. येणारे न्यायमूर्ती शेड्युलकास्ट समाजाचे असतील हा संविधानाचा विजय असल्याचे सदावर्ते म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram