Zero Hour MVA Seat Sharing : 85-85-85 महाविकास आघाडीचा फॉर्म्युला , मित्रपक्षांना झुकतं माप

Continues below advertisement

Zero Hour MVA Seat Sharing : 85-85-85 महाविकास आघाडीचा फॉर्म्युला , मित्रपक्षांना झुकतं माप
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.. स्थळ होतं.. वाय बी सेंटर... 
इथं संध्याकाळी काँग्रेसचे काँग्रेस प्रदेशाध्य़क्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात... विजय वडेट्टीवार तर ठाकरेंच्या सेनेकडून खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई वाय बी सेंटरला पोहोचले.. तिथं आधीच शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होते.. जवळपास सव्वातास बैठक चालली.. 
संजय राऊतांनीच जागांचा फॉर्म्युला सांगितला.. याच संजय राऊतांनी आणखी आकडा सांगितला होता.. तो पाहणार आहोतच.. पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं ठरतं.. 
ते हे जागावाटप समजून घेणं..
संजय राऊतांनी जसं सांगितलं.. तर आज घडीला तीनही प्रमुख पक्षांना प्रत्येकी 85 जागा मिळाल्यात.. म्हणजेच... एकूण 288 पैकी 255 जागांचा प्रश्न मिटला.. त्यात पुढे राऊत म्हणाले.. की आमचं 270 जागांवर एकमत झालंय.. आणि उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार.. म्हणजेच हा आकडा होईल 18... म्हणजेच आज घडीला याच तीनही पक्षांमध्ये 15 जागांवर आजही तिढा कायम आहे... त्यावर पुन्हा मविआच्या बैठका होवू शकतात.. 
गेल्या काही दिवसांचा ट्रेण्ड पाहिला तर काँग्रेसची आक्रमकता दिसून आली.. शिवाय राऊतांनी आज सकळाची सेन्च्युरीची घोषणा केली.. असं असताना आज घडीला मात्र फक्त 85 जागा वाट्याला आल्यात.. हेच जागावाटप अनेकांसाठी धक्कादायक होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram