Zero Hour : मीडिया प्रभाारी श्वेता शालिनी वादाच्या केंद्रास्थानी, टीकेनंतर नोटीस मागे
चहाच्या कपातील या वादळाला कारण होतं महाराष्ट्र भाजपचा आयटी सेल.
आपल्याला माहिती आहे भाऊ तोरसेकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.. राजकीय विश्लेषक आहेत.. राईट विंगमध्ये लोकप्रिय यूट्यूबर आहेत.. ते नरेंद्र मोदींची किंवा भाजपची बाजू सोशल मीडियावर चांगली लावून धरत असतात. अशा भाऊ तोरसेकरांना आणि आणखी एक भाजप समर्थक चेतन दीक्षित यांना आज महाराष्ट्र भाजपच्याच मीडिया प्रभारी असलेल्या श्वेता शालिनी यांनी कायदेशीर नोटीस पाठवली. आपल्या एका व्हिडिओमधून मानहानी केल्याचा आरोप त्यांनी केला. अब्रू नुकसान केल्यामुळे जाहीर माफीनामा, १ रुपये नुकसान भरपाई आणि कायदेशीर नोटिशीचा खर्च म्हणून दहा हजार रुपयांची मागणी श्वेता शालिनी यांनी केली. भाऊंसारख्या कट्टर समर्थकाला भाजपच्याच आयटीसेल पदाधिकाऱ्याने अशी नोटीस पाठवल्यानंतर सर्वच स्तरातून श्वेता शालिनी यांच्यावर टीका झाली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेरेटिव्हसमोर धारातीर्थी पडलेले भाजपच्या आयटी सेलचे सेन्सेक्स भाजप समर्थकांमध्ये आधीच रसातळाला आहे. आपल्या व्हिडियोच्या माध्यमातून ह्या समर्थकांनी निवडणुकीत काय चुकले किंवा काय चुकीचे घडले असे काहीसे सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता समर्थकांनाच भाजपचे आयटी सेल नोटीस पाठवू लागले म्हटल्यावर काय ... कट्टर समर्थक नाराज झाले आणि भाऊंच्या समर्थनात सोशल मीडियावर हिरीरीने बाजू मांडणे सुरु झाले. तर श्वेता शालिनी, भाजप आयटी सेल आणि एकूणच भाजपच्या रणनीतीविरोधात टीकेची झोड सोशल मीडियावर सुरु झाली. शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाऊ तोरसेकरांना फोन केला तसंच श्वेता शालिनी यांनाही समज दिली. त्यानंतर काही तासातच श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकरांना दिलेली नोटीस माघारी घेत असल्याची माहिती