Zero Hour : Maharashtra Kesari : पुणे की धाराशिव... कुठे होणार महाराष्ट्र केसरीची स्पर्धा?
ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत.. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं यावर्षीच्या महाराष्ट्र केसरीचं वेळापत्रक जाहीर केलंय.. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे जिल्ह्यातील लचणीकंदमध्ये होणारय.... ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान होणारय.. मात्र, हीच स्पर्धा धारशिवमध्येही होईल.. अशी घोषणा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संघनेनं केली होती.. त्याचं झालं असं की बृजभूषण सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कुस्ती महासंघने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती.. आणि भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कुस्तीगीर परिषदेला मन्यता दिली होती. त्यांनीच गेल्या वर्षी कोथरुडमध्ये महाराष्ट्र केसरीचं आयोजन केलं होतं. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने न्यायालयात दावा दाखल केला आणि रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कुस्तीगीर परिषदेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर पवारांच्या नेतृत्वाली संघटनेनं यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये होईल अशी घोषणा केली, त्यातच आज तडस यांच्या नेतृत्वातील संघटनेनं नवी घोषणा केली.. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, महाराष्ट्र केसरी नेमकी कुठं होणार? याच उत्तर मिळेल तेव्हा मिळेल.. तुर्सास वेळ झालीय आजच्या कार्यक्रमात इथंच थांबण्याची.. मात्र, तुम्ही कुठेही जावू नका.. कारण ब्रेकनंतर माझा कट्टा.. तो गायक सुखविंदर सिंग.. पाहात राहा एबीपी माझा