Zero Hour Mahapalika Nashik : वाहनं वाढतायंत पण रस्ते तेवढेच, पुण्याच्या रांगेत नाशिकही

Continues below advertisement

Zero Hour Mahapalika Nashik : वाहनं वाढतायंत पण रस्ते तेवढेच, पुण्याच्या रांगेत नाशिकही

महापालिकेच्या महामुद्दे या सेगमेन्टमद्ये आपण ठाण्याच्या घोडबंदर रोड आणि मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या वाहतूक कोंडीचा गेल्या दोन दिवसांत आढावा घेतलाय. मुंबई-नाशिक या महामार्गानं प्रवास करणारी मंडळी तर अक्षरश: वैतागून गेली आहेत. एबीपी माझानं प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सातत्यानं त्याविरोधात आवाज उठवला आहे. पण मुंबई-नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या नाशिककर आपल्या शहरातही अनुभवतायत. नाशिककर मंडळी सध्या त्यांच्या शहरातल्या रोजच्याच वाहतूक कोंडीच्या त्रासानं मेटाकुटीला आलीयत. स्थानिक पोलीस आणि महापालिका प्रशासनातील  समन्वयाचा अभाव, तसंच शहरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांमुळं या वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीतही शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा हा चांगलाच चर्चेत राहणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram