ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 08 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 08 January 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत...केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घेतली भेट...भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात.
काँग्रेसच्या सोनिया दुहान यांच्या मार्फत शरद पवारांच्या खासदारांना संपर्क, खासदार अमर काळेंचा आरोप, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून खंडन
शरद पवारांच्या सात खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरेंची ऑफर, जितेंद्र आव्हाडांचा दावा...सुप्रिया सुळेंची पटेलांकडे तटकरेंबाबत नाराजी, तटकरेंनी आरोप फेटाळले...
धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्य़ा सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा पलटवार...देशमुखांच्या हत्येचा दोन दिवस आधीपर्यंत धस कराडच्या संपर्कात होते, मिटकरींचा आरोप...सीडीआर काढा, धस यांचं आव्हान...
प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांचे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप...कोऱ्या कागदावर सह्या घेऊन धनंजय मुंडेंनी जमीन बळकावल्याचा दावा..
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी नाकारली १० लाखांची शासकीय मदत..सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होईपर्यंत मदत स्वीकारणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांची भूमिका