Zero Hour Mahapalika Mahamudde Chandrapur : महापालिकेचे महामुद्दे, चंद्रपुरात गटार सफाईचे तीनतेरा

Zero Hour Mahapalika Mahamudde Chandrapur : महापालिकेचे महामुद्दे, चंद्रपुरात गटार सफाईचे तीनतेरा
स्वच्छतेसाठी अनेक पुरस्कार मिळवलेल्या चंद्रपूर शहराची ही सध्याची स्थिती. गटारातील गाळ काढणे, तो गाळ उचलून कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांमध्ये टाकणे, आजूबाजूला वाढलेल्या झाडं-झुडपांची आणि कचऱ्याची साफसफाई करणे ही महापालिकेच्या स्वच्छता विभागाची जबाबदारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी कंत्राटदार नेमला जातो, ज्याचे कंत्राटी कामगार हे काम करतात.   मात्र गेल्या २ वर्षांपासून गटारसफाई अजिबात नीट होत नाहीये असा आरोप नागरिक करतायेत.    तर दुसरीकडे माजी नगरसेवक तर अधिक गंभीर आरोप करतायेत. आयुक्तांनी आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराची नेमणूक केलीये, ज्यानं आवश्यक संख्येपेक्षा अर्धेच कामगार नेमलेत असा आरोप आहे.    देशमुख यांच्या आरोपात तथ्य आहे असं वाटतं.  याचं कारण म्हणजे,   शहरातील प्रत्येक गटाराची किमान १५ दिवसांत एकदा सफाई व्हावी असा केंद्र सरकारचा नियम आहे   चंद्रपूर शहरात एकूण  ९०० किलोमीटर लांबीची  गटारं आहेत.  म्हणजे एका दिवसांत  ६० किमी गटाराची सफाई होणं गरजेचं आहे 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola