Kumar Saptarshi Vastav 139 : गांधींचा विचार विरोधकांना तारेला का? कुमार सप्तर्षींची सडेतोड मुलाखत
Kumar Saptarshi Vastav 139 : गांधींचा विचार विरोधकांना तारेला का? कुमार सप्तर्षींची सडेतोड मुलाखत
- महात्मा गांधींच्या विचारांवर मंथन व्हावं आणि गंधीजींचे विचार आजच्या पिढीसमोर नेमकेपणाने पोहोचावेत यासाठी पुण्यात गांधी विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय . पुण्यातील महाराष्ट्र गांधी स्मारक निधी कडून पुण्यात सात , आठ आणि नऊ मार्च असे तीन दिवस या संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. या संमेलनाला सोनम वांगचुक , खासदार मनोज कुमार झा , पत्रकार सुरेश द्वादशीवार असे देशभरातील गांधीवादी कार्यकर्ते आणि विचारवंत उपस्थीत राहणार आहेत
हे ही वाचा..
कार्यक्षेत्रात रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. रस्ते विकसित करतानाच उपयोगिता वाहिन्यांची देखील कामे सुरू आहेत. एकदा रस्तेविकास झाला की, त्या रस्त्यावर खोदकाम, चर करायला तात्काळ प्रभावाने मनाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणासाठी नव्याने रस्ते खोदकाम करू नये, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण 324 किलोमीटर (698 रस्ते) तर दुसऱ्या टप्प्यात 377 किलोमीटर (1420 रस्ते) असे एकूण मिळून 701 किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. टप्पा 1 मधील 75 टक्के कामे आणि टप्पा 2 मधील 50 टक्के कामे दिनांक 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.