Zero Hour Mahapalika Chandrapur :अमृत योजनेच्या कामांचा परिणाम, विकासकामांमुळे चंद्रपुरची दुरवस्था

Continues below advertisement

Zero Hour Mahapalika Chandrapur :अमृत योजनेच्या कामांचा परिणाम, विकासकामांमुळे चंद्रपुरची दुरवस्था

मंडळी, भारतानं अलीकडच्या काळातलं शेवटचं युद्ध लढलं १९९९ साली. कारगिल आणि आसपासच्या परिसरात ते युद्ध झालं होतं. आता तुम्ही म्हणाल महापालिकेचे महामुद्दे या सत्रात युद्ध कुठून आलं? तर त्याचं असं आहे मंडळी, की चंद्रपूर शहरातले अनेक परिसर सध्या युद्धग्रस्त दिसतायत. आणि त्याचं संपूर्ण 'श्रेय' जातं ते चंद्रपूर महापालिका आणि संबंधित कंत्राटदारांना. नक्की काय चाललंय चंद्रपूरमध्ये, पाहूयात आमच्या महापालिकेचे महामुद्देमधल्या चंद्रपूरच्या स्पेशल रिपोर्टमध्ये.शहरात एखादं विकासकाम सुरूय म्हटलं की हल्ली अनेकदा धडकीच भरते. चंद्रपूरकरांना सध्या याची प्रचिती येतेय. पाहावं तिथं खोदून ठेवलेले रस्ते दिसतात. आणि काम पूर्ण जरी झालं असलं तरी खड्डे बुजवण्याचं काम अतिशय वाईट पद्धतीनं केलेलं दिसतं. त्यामुळे चंद्रपूरमध्ये अगदी चंद्रावर आहेत तसेच खड्डे पडलेले दिसतायेत. या दुरवस्थेमागचं कारण नेमकं काय ते जाणून घेऊयात चद्रपुरात सध्या दोन महत्त्वाच्या योजना राबवण्यात येतायेत. अमृत जलपुरवठा योजना ही २७० कोटींची योजना असून त्याअंतर्गत १५३ किलोमीटरची पाईपलाईन टाकली जातेय. त्याचबरोबर सांडपाणी वाहतूक ही ५४२ कोटींची योजना देखील राबवण्यात येतेय. या योजनेअंतर्गत सांडपाण्यासाठी २३४ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. 



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram