Zero Hour Kargil War: महायुतीचं बिघडलंय? अजित पवारांनी शरद पवारांना सोडून चूक केली?
Zero Hour Kargil War: महायुतीचं बिघडलंय? अजित पवारांनी शरद पवारांना सोडून चूक केली?
देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपले सैनिक जल,जमिन, आकाश सर्व ठिकाणी डोळ्यात तेल घालून पहारा देतात.. मातृभूमीसाठी प्रसंगी प्राणांचं बलिदान देतात. भारताने कधीही पहिली गोळी झाडली नाही, कधीही स्वत: लढाईला तोंड फोडलं नाही, जेवढी युद्ध लढावी लागली ती सगळी शेजाऱ्याने आक्रमण केल्यानंतरच लढली गेली. कारगीलचं युद्ध असंच एक युद्ध होतं. एकीकडे पाकिस्तान सरकार शांततेची बोलणी करण्याचं नाटक करत होतं, त्याच वेळी पाकिस्तान लष्कर प्रशिक्षित अतिरेकी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करत होते.. शेजारी राष्ट्रांसोबत सलोख्याचे संबंध ठेवू पाहणाऱ्या वाजपेयी सरकारसाठी तो मोठा धक्का होता.. आपल्या जवानांनी पाकिस्तानातून घुसखोरी केलेल्या एकेक अतिरेक्याला यमसदनी तरी धाडलं किंवा पाकिस्तानात पळवून तरी लावलं. यातून पाकिस्तानने धडा घेतला. .नंतर सीमेवर थेट युद्ध केलं नाही, पण जिहादी विचारांचा प्रसार करुन.. धर्मांध तरुणांची माथी भडकावून, त्यांना दहशतवादी प्रशिक्षण देऊन भारताच्या विविध भागात नंतरची १०-१५ वर्ष अतिरेकी हल्ले सुरु ठेवलेे... मोदी सरकारच्या काळात यावर नियंत्रण आलं असलं तरी सीमेवर आणि सीमेच्या आत धोका कायम आहे. सीमेवर जवान जसे प्राणपणाने सीमेचं रक्षण करतात त्याच प्रमाणे सीमेच्या आत नागरिकांनी आपली कर्तव्य पाळणं, सजग राहाणं, देशविघातक विचारांना उघडं पाडणं गरजेचं आहे. तसं केलं तर ती सीमेवर आपल्यासाठी सर्वस्व पणाला लावून उभा असलेल्या, आत्तापर्यंत बलिदान दिलेल्या सैनिकांना मानवंदना ठरेल...
झीरो अवरमध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची..