Zero Hour : युद्धाला 25 वर्ष, कारगिलनंतर किती बदलला भारत?
Zero Hour : युद्धाला 25 वर्ष, कारगिलनंतर किती बदलला भारत?
भारत-पाकिस्तान या देशांदरम्यान कारगिल येथे १९९९ मध्ये युद्ध झाले साठ दिवसानंतर २६ जुलै रोजी कारगिलवर विजय मिळवता पुन्हा भारताने ताबा मिळविला आज कारगिल विजयाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात एनसीसीच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला..यावेळी या कारगिल युद्धामध्ये सहभागी झालेले जवान व लासलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अमर जवान स्तंभाला लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस हवालदार व माजी जवान संजय देशमुख तसेच संस्था चालक व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करत शहीद जवानांना अभिवादन केले यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भारत माता की जय... वंदे मातरम च्या घोषणा दिल्या या घोषणेने परिसर दणाणून गेले होते