Zero Hour HIt and Run : नागपूरमध्ये हिट अँड रन, दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी
Zero Hour HIt and Run : नागपूरमध्ये हिट अँड रन, दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी
एकाचा वाढदिवस, दुसऱ्याचा काळ बनून आल्याची घटना नागपुरात घडली.. २० ते २२ वयोगटातील सहा मित्र एका मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करुन परत येत होते, गाडी त्यांच्यातलाच एक मद्यधुंद मित्र चालवत होता, मद्याच्या अंमलात त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्याने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना आपल्या कारखाली चिरडलं.. त्यात एका बालकासह दोघांचा मृत्यू झाला तर सात गंभीर जखमी झाले.. ((घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारखाली लोकं असतानाच कारचालकाने गाडी रिव्हर्स घेतल्याने अपघाताची तीव्रता आणखी वाढली. ))कार चालक भूषण लांजेवार आणि त्याच्या मित्रांना पोलीसांनी अटक केली आहे. ((पुण्यातील अपघात ताजा असतानाच पुन्हा ड्रिंक एंड ड्राईव्हची घटना वेदना वाढवणारी आहे.)) दारु पिऊन गाडी चालवू नका, स्वत:सोबत इतरांच्या आयुष्याशी खेळू नका एवढंच आवाहन आपण करु शकतो.