Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणार
Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उद्या रेशीमबाग मैदानावर होणार आहे. यंदा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उद्या काय उद्बबोधन करणार, कोणत्या विषयांवर भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचा लक्ष राहणार आहे... संघाने शताब्दी वर्षात प्रवेश करताना कोणत्याही जल्लोष किंवा सेलिब्रेशन ची घोषणा केलेली नाही.. मात्र, त्या अनुषंगाने ठरवलेले सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, देशाची आत्मनिर्भरता, पर्यावरण समतोल आणि नागरी कर्तव्य या पंचसूत्री कार्यक्रमाचा पुनरुच्चार उद्या सरसंघचालक स्वयंसेवकांसमोर करू शकतात अशी शक्यता आहे.. त्या शिवाय महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही संघप्रमुख सांकेतिक विधान करू शकतात.. तसेच देशात आणि जगात होत असलेल्या घडामोडी याबाबत सरसंघचालक काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष राहणार आहे... यंदा विजयादशमी उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. के राधाकृष्ण उपस्थित राहतील... त्याशिवाय मोठ्या संख्येने शास्त्रज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनाही संघाच्या विजयादशमी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे... रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि तामिळनाडूच्या प्रख्यात दिनामलार वर्तमानपत्राचे संपादक राम सुब्बू दिल्ली उद्याच्या सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे...