Zero Hour Guest Center : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाला विरोध?

Continues below advertisement

Zero Hour Guest Center : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाला विरोध?
महाविकास आघाडीमध्ये जरी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत एकवाक्यता नसली.. तरी निवडणुकीसाठी आपला पक्ष बळकट करण्याची, नेत्यांची मोट बांधण्याची तयारी जोरात सुरूय.. आणि यामध्ये शरद पवारांनी चांगलीच आघाडी घेतलीय.. कालच कागलमध्ये भाजपचे नेते समरजीत घाटगेंचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून घेतला... इंदापूरमध्ये उमेदवारीवरून धुसफूस सुरू असल्याने भाजप नेते, हर्षवर्धन पाटीलही शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत.. अशातच आता शरद पवार, अजित पवारांचा गड असलेल्या चिंचवडमध्ये गळ टाकण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येतंय.. तेही अजितदादांचे खंदे समर्थक असलेल्या नाना काटेंसाठी... त्यांची जयंत पाटलांशी चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहितीय.. झालंय असं की, चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्यानं ही जागा भाजपला सुटणार हे जवळपास निश्चित झालंय.. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नाना काटेंनी आता माघार नाही, ही भूमिका स्पष्ट केलीय.. तसंच त्यांनी चिन्हावरच लढणार हेही जाहीर केलंय..  महाविकास आघाडीत चिंचवडची जागा शरद पवार पक्षाला जाण्याची दाट शक्यताय... त्यामुळे चिंचवडची जागा भाजपने न सोडल्यास, नाना काटेही तुतारी फुंकण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram