Zero Hour Full Savarkar Controversy | सावरकरांबाबत बोलताना राजकीय पक्षांची कोंडी?
Zero Hour Full Savarkar Controversy | सावरकरांबाबत बोलताना राजकीय पक्षांची कोंडी?
स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणात लोकसभा विरोधी पक्षनेते तथा राहुल गांधी यांच्याविरुद्ध लखनौ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना बेजबाबदार विधाने करू नका असा इशाराही दिला.
स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणे चुकीचे
जर भविष्यात त्यांनी पुन्हा असे विधान केले तर न्यायालय त्या विधानाची दखल घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, 'तुम्ही महाराष्ट्रात असे विधान केले. तिथे लोक त्यांची पूजा करतात. तुमच्या आजीनेही सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. महात्मा गांधी जेव्हा ब्रिटीश अधिकाऱ्यांना पत्रे पाठवत असत तेव्हा ते लिहित असत, तुमचा विश्वासू सेवक. तर त्यामुळे तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणणार का? स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणे चुकीचे आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी अकोल्यात सावरकरांबद्दल एक विधान केले होते. त्यावेळी ते काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत होते आणि ही यात्रा महाराष्ट्रातून जात होती. 17 डिसेंबर 2022 रोजी ते महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात होते. येथे त्यांनी सावरकरांचा उल्लेख 'ब्रिटिशांचा सेवक' असा केला होता ज्यांना ब्रिटिश सरकारकडून पेन्शन मिळत असे.