Zero Hour :दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका? ते लाडकी बहीण योजनेवरुन आरोप प्रत्यारोप झीरो अवरमध्ये चर्चा लाडक्या योजनेबाबत आपल्याच लोकांच्या अतिउत्साहीपणामुळे महायुतीला अशा पद्धतीची टीका सहन करावी लागत आहे.. ((नुकसान जास्त वाढू नये यासाठी तिन्ही पक्षाच्या आणि सरकारमधील सर्वात मोठ्यानेत्यांना सारवासारव करावी लागली.. ))डॅमेज कंट्रोल म्हणून अमरावतीत आज झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीपासून आमदार रवी राणा यांना दूर ठेवलं गेलं.. तसंच जळगावात पार पडलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला तसंच उथळ वक्तव्य करणाऱ्या आपल्या नेत्यांनाही समज दिली..