Zero Hour Full | मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज, उद्या फडणवीसांची भेट घेणार?

Continues below advertisement

Zero Hour Full | मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज, उद्या फडणवीसांची भेट घेणार?


मंत्रिमंडळ विस्तारानंतर भुजबळ दररोज आपली नाराजी बोलून दाखवत होते. मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो अशा भाषेत त्यांनी आपली तीव्र भावना बोलून दाखवली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत भुजबळ आणि दादांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता फारच कमी आहे. आणि म्हणूनच उद्याच्या भेटीमुळे नाराजी दूर होण्यात काही मदत होते का ते पाहावं लागेल. 

हा कार्यक्रम आटोपल्यावर भुजबळ पुण्यात येतील, आणि पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये एका कार्यक्रमात भुजबळ आणि शरद पवार एका व्यासपीठावर येणार आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचं निमित्त साधून अमोल कोल्हेंनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलाय. त्यामुळं उद्याचा दिवस हा राजकीयरित्या महत्त्वाचा ठरणार यात शंका नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram