Zero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?

Continues below advertisement

Zero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघा सह अहेरी आणि वाशिम मधून शेकडो कार्यकर्ते नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते...   फडणवीस देवगिरीला दाखल झाल्यानंतर त्यांनी एके एक करून कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या समूहांची भेट घेतली...   त्यावेळी चंद्रपूरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी ब्रिजभूषण पाझारे यांना उमेदवारी दिली पाहिजे.. अशी मागणी करत अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये असा आग्रह लावून धरला....   चंद्रपूर शिवाय वाशिम आणि अहेरी मतदार संघातील पदाधिकारी पण मोठ्या संख्येने देवगिरी या ठिकाणी दाखल झाले होते..    अहेरी मधून आलेल्या कार्यकर्त्यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढवावी आणि राजे अंबरीशराव आत्राम यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी लावून धरली...   तर वाशीम मधून आलेल्या कार्यकर्त्यांनी लखन मलिक यांना उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह धरला... देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणं ऐकून घेत पार्टी या संदर्भात योग्य निर्णय करील असा आश्वासन दिल्याची माहिती आहे....

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram