Zero Hour : 1 किमीच्या रुंदीकरणाला 10 वर्ष लागणार? अकोला महापालिकेचा संथ कारभार
Zero Hour : 1 किमीच्या रुंदीकरणाला 10 वर्ष लागणार? अकोला महापालिकेचा संथ कारभार
सांगलीतून जाऊयात अकोल्यात. अकोला महापालिकेने सध्या शहरातील डाबकी रोडच्या विस्तारीकरणाचे काम सुरू केलंये. हा अकोल्यातील जुन्या भागातला अतिशय गजबजलेला रस्ता आहे. मात्र, 1 हजार 160 मीटरच्या रस्ता रूंदीकरणाचं काम कासवगतीने सुरूये. त्यातच धुळ आणि टीडीआरच्या माध्यमातून मिळणाऱ्या नुकसान भरपाईबाबत नागरिकांचा महापालिकेवर रोष आहे.
हे ही वाचा..
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिक सध्या वाढलेल्या घरपट्टीने अस्वस्थ झाले आहेत. दुप्पट, तिप्पट निवासी घरपट्टी तर भाडेकरारावर ५८ टक्के घरपट्टी आकारणीच्या महापालिकेच्या निर्णयाने साऱ्यांची झोप उडाली आहे.
सेवासुविधांच्या कमतरतेने आधीच नाराज असलेल्या नागरिकांना घरपट्टीच्या ओझ्याखाली दाबून टाकण्याचे काम प्रशासकीय स्तरावर सुरू झाले आहे..
महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलेली वाढीव करवाढ रद्द करावी. महापालिकेकडून सामान्य कर, जलः निस्सारण कर, मोठ्या इमारती वरील निवासी जागेवरील कर, शिक्षण कर, तसेच महाराष्ट्र शिक्षण कर आणि उपयोगिता कर बाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व रोष दिसून येत आहे. तसेच भाडेकरार वर लावण्यात आलेला ५८% कर हा प्रचंड असून याविषयी सामान्य नागरिकांचे राहणे, जगणे मुश्कील होणार आहे असे नागरिकांचा सूर आहे.