Zero Hour Full : आदित्, अमित ठाकरेंचं शिक्षण इंग्रजीत, हिंदीत मुद्द्यावरुन भाजपचा हल्लाबोल

Zero Hour Full : आदित्, अमित ठाकरेंचं शिक्षण इंग्रजीत, हिंदीत मुद्द्यावरुन भाजपचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निशाणा साधला आहे. ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या, असा हल्लाबोल देखील देवेंद्र फडणवीसांनी केला. मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार आदित्य ठाकरे, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी कोणत्या शाळेत शिक्षण घेतलं, याबाबतची EXCLUSIVE माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola