Zero Hour ABP Majha : भारत जोडो न्याय यात्रा ते वसंत मोरेंचा राजीनामा; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Continues below advertisement

Zero Hour ABP Majha : भारत जोडो न्याय यात्रा ते वसंत मोरेंचा राजीनामा; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

गांधी आणि काँग्रेस... आज देशात अनेकांना एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटू शकतात .. पण ह्याचा अर्थ राजकारणात गांधी परिवाराला संघर्षच  करावा लागत नाही असे नाही. अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा पक्ष संघटनेत बलशाली असणाऱ्यांशी पंत प्रधान असूनही संघर्ष करावा लागला होता. इंदिरा गांधींनाही एकेकाळी पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला होता. राजीव गांधींना सुद्धा गांधी परिवाराशी एकनिष्ठ मानल्या जाणाऱ्या आणि इंदिरा गांधींनी राष्ट्रपती केलेल्या गियानी झेल सिंग पासून तर व्ही पी सिंग सारख्यांचास विरोध अनुभवावा लागला. तर सोनिया गांधींना त्यांच्या अध्यक्षपदावरून शरद पवार, तारिक अन्वर आणि पी ए संगमांसारख्या दिग्गजांचा.. तर अवघ्या काही वर्षांपूर्वी जी २३ गटाचाही विरोधही सहन करावा लागला होता..
असं असलं तरी जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत असते. काँग्रेसला एकत्र यायचे असते, काँग्रेसला निवडणूक लढायची असते, काँग्रेसला भरारी घेऊ पाहायची असते तेव्हा तेव्हा गांधी आडनावाचा चेहरा लागतो. आता हीच काँग्रेस आणखी एका गांधींभोवती एकटवलीय.. नाव राहुल राजीव गांधी.. तुलनेने पक्षाच्या आत राहुल गांधींचा संघर्ष हा कमी राहिलाय. पण राहुल गांधींचा पक्षाच्या बाहेरचा संघर्ष मात्र हा राजीव, इंदिरा किंवा पंडित नेहरूंपेक्षा कितीतरी जास्त राहिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram