Yugendra Pawar : बारामतीत शरद पवारांना लोकांची साथ - युगेंद्र पवार

Continues below advertisement

Yugendra Pawar : बारामतीत शरद पवारांना लोकांची साथ - युगेंद्र पवार 

हेही वाचा : 

 महायुतीकडून आज अडीच वर्षांच्या कामाचे रिपोर्टकार्ड सादर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाची माहिती सादर करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदेंनी विविध मुद्द्यांवर देखील भाष्य केलं.  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या पत्रकार परिषदेत म्हणाले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तुम्ही दोन-तीन कोटी रुपये देता...आम्ही साडेतीनशे कोटी रुपये दिले. हे जनतेचे पैसे आहेत. त्यामुळे जनतेचा जीव वाचवला पाहिजे. कोणी आमच्याकडे आला की लगेच आम्ही सही करतो. ते (उद्धव ठाकरे) तर पेन काढत नव्हते, पेन ठेवतही नव्हते..असं एकनाथ शिंदे म्हणताच अजित पवार यांना हसू आले. यानंतर पत्रकार परिषेदत उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर अजित पवार देखील साक्षीदार होते असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.   आमच्या लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करणार- लाडकी बहीण योजनला मोठा प्रतिसाद आहे. सर्व लाडक्या बहिणी महायुती सरकारच्या पाठिशी आहेत. ही योजना गेम चेंजर झाली आहे. मात्र, विरोधक ही योजना (CM Ladaki Bahin Yojana) बंद करण्यासाठी कोर्टात जात आहेत. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा हात लावला तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असं इशारा एकनाथ शिंदेंनी दिला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram