Yotube channel:भारताविरोधी खोटा प्रचार करणाऱ्या 35 युट्यूब चॅनल्सवर बंदी: ABP Majha
Continues below advertisement
भारताविरोधात प्रसार केल्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानातून चालविल्या जाणाऱ्या ३५ यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातलीय. या चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्सची संख्या एक कोटी वीस लाख इतकी तर VIEWERSची संख्या १३० कोटींहून अधिक आहे. या ३५ यू ट्यूब चॅनेल्ससह दोन इन्स्टाग्राम अकाऊंट, दोन ट्विटर अकाऊंट, दोन फेसबुक अकाऊंट आणि दोन वेबसाईटवरुन भारताविरोधात खोटा प्रचार केला जात होता. हे सर्व यूट्यूब चॅनेल्स, अकाउंट आणि वेबसाईट बंद करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण खात्याने दिलेत. तथ्यहीन प्रचार आणि भारतविरोधी माहिती प्रसारित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही सर्व सोशल मीडिया अकाऊंट, यूट्यूब चॅनेल्स पाकिस्तानातून चालवली जात होती असा दावा माहिती आणि प्रसार खात्याचे सहसचिव विक्रम सहाय यांनी केलाय.
Continues below advertisement