Delhi Taj Hotel : 'मी कष्टाच्या पैशांनी चप्पल घेतली', YourStory CEO श्रद्धा शर्मांना Taj हॉटेलमध्ये अपमान?
Continues below advertisement
दिल्लीतील ताजमहाल हॉटेलमध्ये (Taj Mahal Hotel) 'युअरस्टोरी'च्या (YourStory) संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा (Shraddha Sharma) यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'मी कोल्हापुरी चप्पल घालते त्या मी माझ्या कष्टाच्या पैशांनी घेतलेल्या आहेत आणि इथे आले आहे, पण इथं स्टाफने मला पाय खाली ठेवून बसा असं सांगितलंय,' असं म्हणत शर्मा यांनी आपला संताप व्यक्त केला. श्रद्धा शर्मा हॉटेलमधील 'हाऊस ऑफ मिंग' (House of Ming) या फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. कोल्हापुरी चप्पल आणि सलवार कमीज परिधान केलेल्या शर्मा या मांडी घालून बसल्या होत्या, ज्यावर हॉटेलच्या मॅनेजरने आक्षेप घेतला. 'हे एक फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे आणि येथे श्रीमंत लोक येतात, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बसावे,' असे मॅनेजरने म्हटल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे. इतकेच नाही तर, त्यांना 'क्लोज्ड शूज' घालण्याचा सल्लाही देण्यात आला, ज्यामुळे हा वाद आणखीच चिघळला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement