Thackeray Brothers : 'दोन्ही भाऊ सतत भेटणार, राजकीय अर्थ काढू नका', MNS नेते Avinash Jadhav यांचे स्पष्टीकरण
Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 'मुंबईमध्ये राज ठाकरेच काय? उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस लढणार नाही', असे खळबळजनक विधान भाई जगताप यांनी केले आहे. दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच, मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'दोन्ही भाऊ सतत एकमेकांना भेटणार आहेत आणि याला राजकीय दृष्टीने पाहू नये, या कौटुंबिक भेटी आहेत', असे जाधव म्हणाले. या सर्व घडामोडींमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement