Snake Bite Death Buldhana : प्रशिक्षणाशिवाय सापाला पकडल्यामुळे 22 वर्षीय तरुणाचा सर्पदंशानं मृत्यू
प्रशिक्षणाशिवाय सापाला पकडणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय. बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव इथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. प्रशिक्षणाशिवाय सापाला पकडल्यामुळे राजू महाले या 22 वर्षीय तरुणाचा सर्पदंशानं मृत्यू झालाय. घरासमोर राजूला नर आणि मादी साप दिसले. त्याने सापाला पकडण्याचं नसतं धाडस केलं. त्यावेळी 4 ठिकाणी सर्पदंश केल्यानं राजूच्या पूर्ण शरीरात विष भिनलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान राजूचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशिक्षण किंवा साप हाताळण्याची माहिती नसेल तर विषारी जातीच्या सापांना पकडण्याचं नसतं धाडस करु नका, असं आवाहन एबीपी माझा आपल्याला करत आहे.