Yawatmal School: 'येत्या 4-5 दिवसात राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार'- बच्चू कडू

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय 4 ते 5 दिवसात घेतला जाईल अशी माहिती शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी दिलेय. कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद आहेत मात्र त्या शाळा सुरू करण्याची मागणी आता अनेक ठिकाणी होत आहे . राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या मुख्य सचिवांंना पाठविला असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय. या प्रस्तावात गाव आणि जिल्हा पातळीवर शाळांबाबतचा निर्णय घ्यावा असा प्रस्ताव शालेश शिक्षण विभागाचा आहे. यावर आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola