Dushyant Chaturvedi | विधानपरिषद पोटनिवडणूकीत महाविकास आघाडी विजयी, भाजपला धक्का
Continues below advertisement
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार बनल्यानंतर भाजपला पहिला मोठा धक्का बसला आहे. यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय झाला आहे. 31 जानेवारीला विधानपरिषदेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ही निवडणूक पार पडल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
Continues below advertisement