CAA Protest | नागपाड्यातील आंदोलनावरून आयोजक- आंदोलकांमध्ये दुमत | ABP Majha
मुंबईच्या नागपाड्यात सुरू असलेल्या आंदोलनावरून आयोजक आणि आंदोलकांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. दिल्लीच्या शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईत सुरू असलेलं 'मुंबई बाग' आंदोलन मागे घेण्याची तारीख आयोजकांकडून निश्चित करण्यात आली आहे. आंदोलनाचे आयोजक नसीम सिद्दीकी यांनी ही माहिती दिली. परंतु, आंदोलक महिलांनी मात्र आंदोलन मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे.