Yavatmal : अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात भांब राजा गावाचे माजी सरपंच सुनील डिवरे यांचा जागीच मृत्यू
शिवसेनेचे पदाधिकारी आणि भांब राजा गावातील माजी सरपंच सुनील डीवरे यांची राहत्या घरा समोरच गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. काल सायंकाळी सुनील डीवरे हे घरी असतांना त्यांच्यावर घरासमोर अचानकपणे अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यात डीवरे त्यांचा मृत्यू झालाय.