Pune Hinjewadi Building Collapsed : येरवडा परिसरात निर्माणाधीन मॉलचा स्लॅब कोसळून 7 कामगारांचा मृत्यू
मिकी घई, एबीपी माझा, पुणे
Updated at:
04 Feb 2022 08:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या निर्माणाधीन मॉलचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत ५ कामगारांचा मृत्यू झालाय. काल रात्री पावणेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडलीय. स्लॅबसाठी बनवलेली लोखंडी जाळी अचानक कोसळली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी तिथे दहा कामगार काम करत होते. यातील सात कामगारांचा मृत्यू झालाय. तर दुर्घटनेतील इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय.