Yavatmal Rain Updates : Wardha नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला ABP Majha
Yavatmal Rain Updates : यवतमाळमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. बाभूळगाव शहरालगत असलेल्या नदीवरुन पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटलाय. नदीकाठी असलेल्या अनेक घरात पुराचं पाणी शिरण्याचा धोका आहे. राळेगाव तालुक्यातील झाडगाव या गावातील शंभर पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचे पाणी शिरलंय. वर्धा नदीवरील रामतीर्थ गावाजवळील पूल पाण्याखाली गेलाय. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यच्या सीमेवरील पूल पाण्याखाली गेलाय. बेंबळा प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडल्याने वर्धा नदीला पूर आलाय. नदीवरून कुणी वाहतूक करू नये यासाठी राळेगाव पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आलाय.
Tags :
Maharashtra Monsoon IMD Mumbai Rains Weather Updates Maharashtra Rains Wardha River Yavatmal Rain Monsoon 2022 Yavatmal Rain Updates