Yavatmal : सेलिब्रेटी महिलेचा फोटो वापरुन दिल्लीच्या डॉक्टरवर हनी ट्रॅप, दोन कोटींची फसवणूक

Continues below advertisement

यवतमाळ : लोकप्रिय विदेशी महिला सेलिब्रेटीचा फोटो वापरत दिल्लीच्या डॉक्टरवर हनी ट्रॅप केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला बनून जाळ्यात अडकवणाऱ्या यवतमाळच्या आरोपीला पोलीसांनी पकडले असून तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.  सोशल मीडियाचा वापर करुन दिल्लीच्या प्रतिष्ठित डॉक्टरला हनी ट्रॅप द्वारे तब्बल 2 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.  महिला बनून डॉक्टरला जाळ्यात अडकविणाऱ्या पुरुष आरोपीला यवतमाळ पोलीसांनी 24 तासात बेड्या घातल्या आहे.

आपण स्मार्ट फोन वापरत असलो तरी बरेच व्यक्ती स्मार्ट फोन वापरण्याइतपत स्मार्ट आहोत काय हे आज तपासून पाहण्याची गरज आज आहे. बरेचदा फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते किंवा स्वीकारली जाते. काहीवेळी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणारी व्यक्ती नेमकी कोण कुठली याची खातरजमा न करता फक्त सुंदर चेहऱ्यावर मोहित होऊन मैत्री करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय दिल्लीच्या एका प्रसिद्ध नामांकित डॉक्टरला यवतमाळमध्ये आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram