Mumbai : राजकारणीच बेपर्वा मग जनतेत कुठून येणार शिस्त? ठिकठिकाणी बाजारांमध्ये गर्दीच गर्दी

Thane Market : गणेशोत्सवाच्या आधी शेवटच्या रविवारी जबरदस्त खरेदी ग्राहकांकडून केली जाते. या गर्दीने बाजारपेठा फुलून जातात. ठाण्यात देखील स्टेशन रोड वर दरवर्षी चालायला जागा नसेल इतकी गर्दी बघायला मिळायची. मात्र यावर्षी थोडी कमी गर्दी दिसून आली. पूजेचे सामान ज्या बाजारात मिळते त्या बाजारात देखील दरवर्षी पेक्षा कमी गर्दी होती. याचे कारण म्हणजे सतत पडणारा पाऊस आणि महापालिकेची फेरीवाल्यांविरोधात कारवाई. या रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांवर पालिकेच्या पथकाकडून अनेक वेळा कारवाई झाल्याने त्यांच्याकडील विक्रीसाठी आणलेला माल पालिकेने जप्त केला. त्यामुळे फेरीवाले नसल्याने देखील ठाण्यात बाजारात कमी गर्दी दिसून आली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola