Yavat Violence | यवतमध्ये तणावपूर्ण शांतता, हिसांचारानंतर जमावबंदी लागू
यवतमध्ये काल निर्माण झालेल्या तणावानंतर आज परिस्थिती नियंत्रणात आहे. यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून, जमावबंदीचे आदेश लागू आहेत. सोशल मीडियावरच्या एका पोस्टमुळे काल यवतमध्ये हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली, ज्यात काही दुचाकी पेटवून देण्यात आल्या. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. सध्याच्या तणावामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. "खरं तर सव्वीस जुलैपासून या यवतमध्ये जे आहे ते तणावाचं वातावरण पाहायला मिळत होतं. मात्र त्याचा काल उद्रेक झाला आणि दोन गटांमध्ये जे आहे ते तणावाचं वातावरण निर्माण झालं." दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या वीस ते पंचवीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जमावबंदीमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.