Tuljabhavani Temple Update | तुळजाभवानीची तलवार गायब, पुजाऱ्यांचे गंभीर आरोप!
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या खजिना खोलीतील तलवार गायब झाली आहे. ही तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला आहे. पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंत्रोपचारानं तुळजाभवानी देवीच्या आठ आयुधातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब करण्यात आली आहे. पद्मश्री गणेश द्रविड शास्त्री यांच्यामार्फत पूजा करून शस्त्रातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्याचा पुजाऱ्यांनी दावा केला होता. होम हवन करून तुळजाभवानीची शक्ती तलवारीमध्ये काढून घेतल्याचं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. भक्तांना दर्शन घेण्यासाठी गहाळ झालेली तलवार तुळजाभवानी देवीजवळ किंवा मंदिरात कुठेही ठेवावी अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे. श्री तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला माहिती न देता द्रविडशास्त्रींच्या मार्फत मंदिर संस्थानी होम हवन विधी केल्याचा पुजाऱ्यांचा आरोप आहे.