Yashwant Manohar on Sharad Pawar : राज्याच्या राजकारणातून दूर जाऊन, देशात BJPला पराभूत करावं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर: शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणापासून दूर जावं, त्यांच्या पक्षात व कुटुंबात जे काही सध्या सुरू आहे, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर (Yashwant Manohar) यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आज वाढदिवस (Sharad Pawar Birthday) आहे. ते नागपुरात दाखल झाले असून त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. भविष्यात राष्ट्रवादी पक्ष उरला नाही, तरी ते महान आहेत, असे म्हणत शरद पवारांचे कौतुक केले आहे.
शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणापासून दूर जावं. शरद पवारांच्या पक्षात आणि कुटुंबात जे काही सध्या सुरू आहे. त्या प्रश्नांना बाजूला सारून फक्त राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात भाजपला हरवण्यासाठी बहुजनांना एकत्रित आणण्यावर लक्ष केंद्रित करावं असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी शरद पवारांना दिला आहे. जरी भविष्यात त्यांचा राष्ट्रवादी पक्ष उरला नाही, तरी ते महान आहेत. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर लक्ष घालाव अशी अपेक्षा मनोहर यांनी व्यक्त केली