War of Words:'माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही,मी असले चिल्लर धंदे करत नाही'A- यशोमती ठाकूर
Continues below advertisement
अमरावतीमध्ये (Amravati) दिवाळीच्या किराणा कीटवरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. 'माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही, मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही', अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे. राणा दाम्पत्याने दिवाळीनिमित्त वाटलेल्या किराणा मालाचे कीट यशोमती ठाकूर यांच्या घरीही पाठवले, ज्यामुळे त्या चांगल्याच संतापल्या. या किराणा मालाचा दर्जा चांगला नसल्याचा आणि फोटो काढण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. दुसरीकडे, आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी मिठाई आणि किराणा कीट पाठवले. 'तुमचा भाऊ जरी गरीब असला तरी माझी तुम्हाला गिफ्ट देण्याची ऐपत एवढीच आहे', असे म्हणत राणांनी उत्तर दिले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement