NCP Lavani Row: 'ही गोष्ट निषेधार्ह आहे, कारवाई करणार', Praful Patel यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावले
Continues below advertisement
नागपूरमधील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात लावणी सादर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि शहराध्यक्ष अनिल आहिरकर यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. 'ही गोष्ट निषेधार्ह आहे आणि कारवाई करणार असल्याचे' सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, शहराध्यक्ष अनिल आहिरकर यांनी या कार्यक्रमाचे समर्थन केले आहे. 'दिवाळीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी दिली,' असे स्पष्टीकरण अनिल आहिरकर यांनी दिले असून, लावणी सादर करणारी महिला पक्षाची पदाधिकारी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 'वाजले की बारा' या लावणीवर झालेल्या या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement