Yashomati Thakur : Amravati चिखलदऱ्यात स्कायवॉकचा मार्ग मोकळा, सहा महिन्यांपासून रखडलं होतं काम
Amravati Skywalk : अमरावतीमधील चिखलदरा या पर्यटनस्थळी आता काचेचा स्कायवॉक उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. केंद्र सरकारच्या वन विभागानं परवानगी अभावी हे काम सहा महिन्यांपूर्वी थांबवलं होतं. मात्र आता परवानग्यांचं काम पूर्ण झाल्यानं या स्कायवॉकचं काम पुन्हा सुरू होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा क्षेत्रातील टायगर ब्लॉक प्रोजेक्ट अंतर्गत सिडकोकडून हा स्कायवॉक उभारण्यात येतोय. लवकरच याचं काम पूर्ण होईल अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलीय.