Pimpari :राज्यातील तमाशा कलावतांनी अजित पवारांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा : ABP Majha
राज्यातील तमाशा कलावतांनी अजित पवारांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात तमाशा सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी तमाशा कलावंतांनी केली आहे. राज्यात सध्या सर्वांना मुभा आहे मग तमाशा कलावंतांवर अन्याय का? निवडणुका, प्रचार, जल्लोष चालतो मग तमाशा का चालत नाही? असा सवाल यावेळी तमाशा कलावंतांकडून करण्यात आला..