Yashomati Thakur : यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडेंनी साजरी केली भाऊबीज
Continues below advertisement
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी खासदार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांना ओवाळून भाऊबीज साजरी केली, तर भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही बहिणींसोबत हा सण साजरा केला. 'एकतर शेतकरी खरच चिंतेत आहे, गावामध्ये दिवाळी नाहीये', अशी खंत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. आपण एकही फटाका फोडला नाही, कारण बळीराजा सुखी नाही, असेही त्या म्हणाल्या. यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांनी आपल्या विजयाचे श्रेय यशोमती ठाकूर यांना दिले. 'ताईनेच मला खासदार म्हणून संसदेत पाठवलं, ही त्यांचीच मेहनत आहे', असे म्हणत त्यांनी आभार मानले. दुसरीकडे, मुंबईत आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या भगिनींकडून औक्षण करून घेत भाऊबीजेचा सण साजरा केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement