Thackeray Brother Bhaubeej : राज ठाकरे, उद्धव ठाकरे भाऊबीज निमित्त पोहचले बहिणीच्या घरी
Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात वाढलेली जवळीक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने तब्बल २१ वर्षांनंतर उद्धव ठाकरे त्यांच्या भगिनी जयजयवंती ठाकरे देशपांडे (Jayjaywanti Thackeray Deshpande) यांच्या घरी पोहोचले, ज्यामुळे ठाकरे कुटुंब एकत्र आले. या भेटीनंतर 'आता राजकीय युतीची घोषणा हे दोन्ही बंधू कधी करतात? याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागून आहे', अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यापूर्वी २३ डिसेंबर २०२४ रोजी जयजयवंती यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात दोन्ही भाऊ एकत्र आले होते. त्यानंतर ५ जुलै २०२५ रोजी सरकारच्या शासन निर्णयाविरोधात दोन्ही भावांनी एकत्र दंड थोपटले होते. गणेशोत्सव, मनसेचा दीपोत्सव आणि आईच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भेटीनंतर आता भाऊबीजेच्या भेटीमुळे राजकीय युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement